Sara Lee Death – खेळ जगतासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. माजी वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट (WWE) कुस्तीपटू सारा लीचे निधन झाले आहे. तिने वयाच्या ३० व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. सारा लीच्या मृत्यूची बातमी तिच्या आईने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. साराच्या आईने फक्त निधन झाल्याचे सांगितले मात्र ते कोणत्या कारणामुळे झाले याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.
सारा लीच्या निधनाच्या ( Sara Lee Death ) बातमीनंतर WWE तसेच अनेक मोठ्या खेळाडूंनी दुःख व्यक्त केले आहे. सारा लीने तिच्या कारकिर्दीतील शेवटची रेसलिंग २०१६ मध्ये खेळली होती. सारा हिने जवळपास एक वर्ष WWE मध्ये रेसलिंग केली आहे. संपूर्ण जगात तिचे मोठ्या प्रमाणात चाहते पाहायला मिळतात. त्यामुळे साराच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
WWE is saddened to learn of the passing of Sara Lee. As a former “Tough Enough” winner, Lee served as an inspiration to many in the sports-entertainment world. WWE offers its heartfelt condolences to her family, friends and fans. pic.twitter.com/jtjjnG52n7
— WWE (@WWE) October 7, 2022
सारा ली WWE व्यतिरिक्त सध्या सोशल मीडियावर चांगली सक्रिय राहत असत. सोशल मीडियावर तिच्या फोटो आणि व्हिडीओला मोठ्या प्रमाणात चाहते लाईक करायचे. साराने माजी WWE सुपरस्टार वेज्ली ब्लेक याच्यासोबत ३० डिसेंबर २०१७ साली लग्नबंधनात अडकली होती.
This is heartbreakingly tragic. Sending love to her family. Very sweet human who I got the pleasure to know and work with. 💔 RIP Sara Lee pic.twitter.com/bGZ9FZNnXj
— SARAYA (@Saraya) October 6, 2022