माजी केंद्रीय मंत्र्यांचा राष्ट्रवादीला राम-राम; पवारांना लिहले पत्र

अहमदाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस शंकरसिंह वाघेला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यासह त्यांनी पक्षाचे सक्रीय सदस्यत्वही सोडले आहे. जयंत पटेल उर्फ ​​बॉस्की यांची गुजरातमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्यापासून वाघेला पक्ष नेतृत्वावर चिडले होते. राजीनामा हा त्याच संतापाचा परिणाम असल्याचे समजते.

गुजरातच्या राजकारणामध्ये एक दिग्गज नेते मानले जाणारे वाघेला कॉंग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले होते. सुरुवातीला आरएसएस (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) चे सक्रिय सदस्य, वाघेला आणीबाणीनंतर जनता पक्षाच्या तिकिटावर कापडवंजचे पहिले खासदार झाले.

2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी जन विकास मोर्चा नावाची एक नवीन संस्था तयार केली गेली. त्यांची निवडणूक आयोगाकडे नोंद नसल्यामुळे त्यांनी अखिल भारतीय हिंदुस्तान कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर 95 उमेदवार उभे केले. मात्र, त्याला एकही जागा जिंकता आली नाही. त्यानंतर त्यांनी शरद पवनच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

79 वर्षीय शंकरसिंह वाघेला हे 1970 ते 1996 अशी तब्बल भाजप 26 वर्षे भाजपमध्ये होते. तर 1998 ते 2017 ही 19 वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये घालवली. त्यानंतर ते 2017-2019 – जन विकल्प मोर्चा आणि 2019-2020 – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राजकीय कारकिर्दीत पाचव्यांदा एखाद्या पक्षाचा राजीनामा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.