अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन झाले आहे. ते ७० वर्षांचे होते. करोनाची लागण झाल्याने गांधी यांची प्रकृती अत्यवस्थ होती. त्यांच्यावर दिल्लीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिलीप गांधी यांचा करोना अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. यानंतर श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने कालपासूनच त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला
दरम्यान, दिलीप गांधी तीन वेळा नगर दक्षिण मतदार संघाचे खासदार म्हणून निवडून आले होते.