फोर्ब्स मासिकाने जगभरातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 सेलिब्रेटींची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. मागील वर्षी प्रमाणेच या वर्षीच्या यादीत देखील अभिनेता अक्षय कुमारचा समावेश आहे. या यादीत समावेश असलेला अक्षय कुमार एकमेव भारतीय सेलिब्रेटी ठरला आहे.
यावर्षी अक्षय कुमार 48.5 मिलियन डॉलर्स (सुमारे 366 कोटी रुपये) 52व्या स्थानावर आहे. मागील वर्षी तो 65 मिलियन डॉलर कमाईसह 33व्या स्थानावर होता.
अक्षयने हॉलीवूड कलाकार विल स्मिथ (69), एंजेलिना जोली (99), पॉप स्टार्स रिहाना (60), कॅटी पेरी (86), लेडी गागा (87) आणि जेनिफर लोपेझ (56) यांना देखील कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.
2020 फोर्ब्स टॉप-100 सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रेटींमध्ये 590 मिलियन डॉलरसह कायली जेनेरने पहिले स्थान मिळवले आहे.
यानंतर टॉप-10 मध्ये कॅनये वेस्ट, रोजर फेडरर, ख्रिस्तियानो रोनाल्डो, लियोनल मेस्सी, टायलर पेरी, नेमार, हॉवर्ड स्टर्न, लेब्रॉन जेम्स आणि ड्वेन जॉन्सन यांचा समावेश आहे.
दरम्यान, अक्षय कुमार लवकर लक्ष्मी बॉम्ब, सुर्यवंशी, पृथ्वीराज, अतरंगी रे या चित्रपटांसह ऍमेझॉन प्राईमच्या द एन्ड या सीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.