पती, पत्नी और वो, दंगल आणि स्री यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा अपारशक्ती खुराना हा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येणार आहे. आजवर तो सहनायक किंवा साहाय्यक अभिनेता म्हणून पडद्यावर झळकला होता; पण आता तो मुख्य नायकाच्या भूमिकेत अवतरणार आहे.
दिनो मॉरिया निर्मिती करत असलेल्या एका आगामी चित्रपटात त्याची वर्णी लागणार आहे. या चित्रपटाविषयीची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नसली तरी अपारशक्तीच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
अपारशक्तीने आतापर्यंत हॅप्पी फिर भाग जाएगी, बद्रीनाथ की दुल्हनिया, लुका छुपी, जबरिया जोडी यांसारख्या चित्रपटांमधून काम केले आहे. आता मुख्य नायक म्हणून तो कशी कामगिरी करतो हे पाहायचे.