महाराष्ट्र केसरी गटात बोऱ्हाडे, वाडेकर यांना अजिंक्‍यपद

मावळ तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धा : आडकर, वाळूंज, घारे, पडवळ, देशमुख विजेते

लोणावळा – मावळ तालुका निवड चाचणी स्पर्धेत विपुल आडकर, केतन घारे, आकाश पडवळ, अतिश आडकर, आदित्य शिंदे, अभिषेक हिंगे, सूजल वाळूंज, समीर घारे, भाऊ आखाडे, प्रतीक देशमुख यांनी वेगवेगळ्या वजनी गटात विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्र केसरी गटात माती विभागात अनिकेत बोऱ्हाडे (ब्राम्हणवाडी), तर गादी विभागात अजित वाडेकर (डोणे) यांनी अजिंक्‍यपद पटकावले आहे.

पुणे जिल्हा व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने मावळ स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने मावळ तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सव्वाशे कुस्तीगीरांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‌घाटन ऑल्मिंपिकवीर व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषेदेचे सहयोगी उपाध्यक्ष मारुती आडकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, आमदार सुनील शेळके, अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन पै. चंद्रकांत सातकर, किशोर भेगडे, मावळ तालुका कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संभाजी राक्षे, उपाध्यक्ष पै. खंडू वाळूंज, पै. मनोज येवले, सचिव पै. बंडू येवले, पै. तानाजी कारके यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच स्पर्धेचा पारितोषिक वितरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश खांडगे, सुनील भोंगाडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, गणेश काकडे, स्पर्धेचे संयोजक विश्‍वास वाघोले, पै. नागेश वाडेकर, पै. नागेश राक्षे यांच्या हस्ते करण्यात आले.

मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व मावळ स्पोर्टस फाउंडेशन यांच्या वतीने रविवारी (दि. 8) सोमाटणे फाटा येथे आयोजित मावळ तालुका निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत एकूण 115 मल्लांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा बालगट, कुमार व वरिष्ठ गादी आणि माती अशा चार विभागात झाली.

स्पर्धेत पंच म्हणून मारुती आडकर, मोहन खोपडे, बंडू येवले, संदीप वांजळे, पप्पू कालेकर, सागर तांगडे, निलेश मारणे, विक्रम पवळे, संजय दाभाडे, प्रवीण राजिवडे, भानुदास घारे, राकेश सोरटे यांनी काम पहिले.

स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे (विजेता, उपविजेताप्रमाणे) : बालगट (14 वर्षाखालील) –
25 किलो – मयुर सुपे (तळपेवाडी), धिरज शिंदे (उर्से). 28 किलो – कार्तिक आडकर (शिवली), संकल्प चांदेकर (आढले). 32 किलो – सूरज गरवड (भाजे), गौरव शेवाळे (नायगाव). 35 किलो – तेजस कारके (आढे), समीर ननावरे (टाकवे). 38 किलो – ओंकार भोते (परंदवडी), साहिल शेळके (शिंदगाव). 42 किलो – प्रणव चांदेकर (आढले), दुर्गांकुर नाळे (सोमाटणे). कुमार विभाग (17 वर्षाखालील). 45 किलो – अदित्य शिंदे (वारंगवाडी), समर्थ गोवेकर (तळेगाव). 48 किलो – सूजल वाळूंज (शिवणे), सागर जांभूळकर (जांभूळ). 51 किलो – राकेश सुतार (आढे), अभिषेक हिंगे (पिंपळखुटे). 55 किलो – समीर घारे (येलघोल), सतीश मालपोटे (फळणे).
60 किलो – विपुल आडकर (शिवली), तन्मय शेलार (माळवाडी). 65 किलो – साहिल गराडे (धामणे), दिलीप कालेकर (काले). 71 किलो – विकास भांगरे (मळवंडी ठुले), जीवन येवले (वडगाव). 80 किलो – प्रतीक देशमुख (सडवली). 92 किलो – अनिकेत कालेकर (काले).

वरिष्ठ गादी विभाग
57 किलो – केतन घारे (सडवली). 61 किलो – आकाश पडवळ (नवलाख उंब्रे). 65 किलो – विजय सुतार (आढे), ओंकार गराडे (तळेगाव). 71 किलो – अतिश आडकर (शिवली), अनिकेत आडकर (शिवली), 74 किलो – श्रीकांत सावंत (गोडुंब्रे), दिनेश ठुले (मळवंडी ठुले). 79 किलो – शुभम ठाकूर (उर्से). 86 किलो – अजित करवंदे (कल्हाट), ऋषिकेश कटके (नाणे). 92 किलो – अक्षय कारके (आढे).
97 किलो – सुरेश आडकर (शिवली).
86 ते 125 किलो (महाराष्ट्र केसरी गट) – अजित वाडेकर (आढे), समीर शिंदे (उर्से)

वरिष्ठ माती विभाग
57 किलो – अक्षय ढोंगे (सावळा), शिवराज वाघोले (दारूंब्रे)
61 किलो – चेतन ठाकूर (उर्से), अमित सुतार (आढे)
65 किलो – भाऊ आखाडे (शिळींम), सागर करवंदे (कल्हाट)
71 किलो – जितेंद्र गायकवाड (चांदखेड), चक्रधर राक्षे (सांगवडे)
74 किलो – संकेत रसाळ (शिवणे), प्रतीक शिंदे (वारंगवाडी)
79 किलो – वैभव माळी (शेलारवाडी).
86 किलो – प्रदीप तुपे (गेव्हंडे), विशाल येवले (शिवली)
92 किलो – नयन गाडे (कान्हे), सोमनाथ साकोरे (कल्हाट)
97 किलो – किरण घाडगे (माळेगाव), संजय आडकर (शिवली)
86 ते 125 किलो (महाराष्ट्र केसरी गट)
अनिकेत बोऱ्हाडे (ब्राम्हणवाडी), सोमनाथ चोपडे (नायगाव)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.