पुणे – यंदा देश भारतीय संविधानाचे ७५ वे वर्ष साजरे करीत आहे. यानिमीत्ताने जनसांस्कृतिक संस्थेतर्फे संविधान कलामहोत्सव आयोजित करण्यात आला. आहे. सिंहगड रस्त्यावरील साने गुरूजी स्मारकातील निळू फुले सभागृहात हा १८ फेब्रुवारी महोत्सव होणार होणार आहे.
दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते अमोल पालेकर, रसिका आगाशे, बाबा आढाव उपस्थित राहणार आहेत. साहित्य, कला, संस्कृती क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध संघटनांच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यात लोकाभिमुख संस्कृतीमधील मानवतावाद, प्रेम आणि ठोस प्रगतीशील मूल्यांची चेतना यातून साकारण्यात येणार आहे. त्यात तीस कलाप्रकार सादर केले जाणार आहेत. याच्या आयोजनात दत्ता देसाई, गणेश विसपुते, इंदुमती जोंधळे, मिलिंद जंपानरेकर, नंदकिशोर जागडे, इब्राहीम खान, केशव वाघमारे, विनया मालती हरी अदिंचा सहभाग आहे.