अहमदनगर : मंगळवारी रात्री उशिरा नगरमध्ये तुफान पाऊस झाला. त्यामुळे नगर -कल्याण रोडवर असलेल्या सीना नदीच्या पुलावर पाणी आले आहे.
वाहतूक पूर्ण बंद करण्यात आली असून ती केडगाव मार्गे वळविण्यात आली आहे. हा पूर पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.शाळेच्या रिक्षा जाता न आल्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी घ्यावी लागली आहे.कल्याण रोडवरील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या परिसरात रात्री वीजपुरवठाही बंद होता. 8:30 नंतर पाणी ओसरू लागल्याने हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे.