मांडवगण फराटा- करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेकदा सर्व स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे याच पार्श्वभूमीवर चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सेवा देण्यात याव्यात म्हणून सरकारकडून वारंवार मदत करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर नागरगाव (ता. शिरूर) येथील शेतकरी कांतीलाल नाना नलगे यांनी मदत म्हणून पाच हजार रूपयांचा धनादेश पंतप्रधान सहाय्यता निधीला माजी उपसरपंच सचिन शेलार यांच्याकडे सुपूर्द केला.