राजगुरूनगर – चांडोली (ता. खेड) येथे पानटपरीवर गुरुवारी (दि. 17) 4 लाख 85 हजार 991 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलीस यांच्या संयुक्त पथकाने छापा मारून ही कारवाई केली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश लछाराम चौधरी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, पुणे ग्रामीण गुन्हे पथक खेड पोलीस ठाण्याच्य हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकाला बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चांडोली गावात सुरेश चौधरी हा च्या कारमधून गुटखा विकत आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो राक्षेवाडीमध्ये सापडला. त्याच्या गाडीची पोलिसांनी पाहणी केली असता त्यात विमल पान मसाला व त्यासोबत तंबाखुचे पाऊच मिळून आले.
पंचनामा करून 1100 रुपयांचा गुटखा, रोख 18 हजा, कार, मोबाइल आदी वस्तू जप्त करण्यात आल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र मांजरे, राजेंद्र थोरात, पोलीस हवालदार. शंकर जम, मुकुंद आयचीत. रउफ इनामदार, दीपक साबळे, दगडू विरकर, खेड ठाण्याचे पोलीस हवालदार नवनाथ थिटे, विजय सरजीने यांच्या पथकाने केली.