कार्ला, – नवरात्र उत्सव काळात वेहरगाव-कार्ला येथील एकवीरा देवीचे पाच लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. तसेच होमहवनही भक्तीमय वार्तावरणात झाला.
एकवीरा देवीला तलाठी दिपक धनवडे, उपसरपंच काजल पडवळ यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. विश्वस्त नवनाथ देशमुख, विकास पडवळ, पुजारी संजय गोविलकर, गुरव प्रतिनिधी संतोष देशमुख, चंद्रकांत देवकर, मोरेश्वर पडवळ, गणेश देशमुख, प्रकाश पोरवाल यांच्या हस्ते होम पेटवून होमाची विधिवत पुजा केली.
गेले दोन दिवस एकवीरा देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात आले आहे. मात्र भाविकांची संख्या जादा असल्याने सोमवारी रात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. पहाटे देखील मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला होता. नवरात्र काळात पाच लाखांहून अधिक भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली.