Freedom At Midnight| ‘फ्रिडम ॲट मिडनाईट’ ही वेबसिरिज मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या वेबसीरीजचे दिग्दर्शन निखिल अडवाणी करीत असून त्यांनी या वेबसीरीजमधील कलाकारांचा फर्स्ट लूक शेअर केले होते. यात पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि महात्मा गांधी यांच्या लूकमध्ये तीन कलाकार दाखवण्यात आले होते. यानंतर आता आणखी दोन नवीन पात्रांचे लूक प्रदर्शित करण्यात आले आहेत.
या वेबसीरिजमध्ये मोहम्मद अली जिना यांची भूमिका आरिफ जकारियाने केली आहे, तर फातिमा यांची भूमिका इरा दुबेने साकारली आहे. ही वेबसिरीज ‘फ्रीडम ॲट मिडनाईट’ या पुस्तकावर आधारित असून ते लॅरी कॉलिन्स आणि डॉमिनिक लॅपियर यांनी 1975 मध्ये लिहिले आहे. यात भारताची स्वातंत्र्य चळवळ आणि राजकीय घडामोडी यांचे तपशीलवार दाखवेल. तसेच भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीच्या वेळी घडलेल्या घटनांवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
View this post on Instagram
मोहम्मद अली जिना यांची जवळची विश्वासू त्यांची धाकटी बहीण फातिमा होती, जिने देशाच्या स्थापनेनंतर पाकिस्तान महिला संघाची स्थापना केली आणि त्या अंतर्गत महिला स्थलांतरितांच्या कायमस्वरूपी संरक्षणासाठी काम केले. मोहम्मद अली जिना आणि फातिमा जिना यांच्या आधी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभ पटेल यांचे लूक प्रसिद्ध झाले आहेत.
‘फ्रिडम ॲट मिडनाईट’ वेबसीरिजमध्ये चिराग वोहरा महात्मा गांधी यांच्या भूमिकेत, सिद्धांत गुप्ता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भूमिकेत तर राजेंद्र चावला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत दिसत आहेत. या वेबसीरिज लवकरच सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
हेही वाचा:
अभिनेता अल्लू अर्जुन अडचणीत ! आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल ; जाणून घ्या काय आहे प्रकरण