Share Market 23 May 2024: सेन्सेक्स आणि निफ्टीने गुरुवारी, 23 मे रोजी नवा इतिहास रचला आहे. सेन्सेक्सने 1.6% झेप घेतली आणि 75,499.91 अंकांच्या नवीन शिखराला स्पर्श केला. निफ्टीने 22,993.60 चा नवा विक्रम केला आणि 23,000 ची पातळी तोडण्याच्या अगदी जवळ आला. या विक्रमी वाढीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज एका झटक्यात सुमारे 4.15 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. फार्मा आणि मेटल वगळता बीएसईचे सर्व क्षेत्रीय निर्देशांक आज हिरव्या रंगात बंद झाले. तर बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.58 टक्क्यांच्या वाढीसह आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.27 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.
व्यवहाराच्या शेवटी, BSE सेन्सेक्स 1196.98 अंकांनी किंवा 1.61% ने वाढून 75,418.04 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 369.85 अंकांच्या किंवा 1.64% च्या उसळीसह 22,967.65 वर बंद झाला.
Sensex-Nifty New Record: पुन्हा भाजपचेच सरकार येणार: शेअर बाजार वाढीची 5 कारणे जाणून घ्या
गुंतवणूकदारांनी कमावले ₹4.15 लाख कोटी –
BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज 23 मे रोजी 420.09 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार, 22 मे रोजी 415.94 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप आज 4.15 लाख कोटी रुपयांनी वाढले आहे. गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 4.15 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
सेन्सेक्सचे 5 सर्वाधिक वाढणारे समभाग –
बीएसई सेन्सेक्समधील 21 पैकी 27 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) चे शेअर्स सर्वाधिक 3.55 टक्क्यांनी वाढले. यानंतर, लार्सन अँड टुब्रो (L&T), ॲक्सिस बँक, मारुती सुझुकी आणि अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स सर्वाधिक वाढले आणि 2.74% ते 3.38% च्या वाढीसह बंद झाले.
सेन्सेक्सचे सर्वाधिक घसरलेले 5 समभाग –
सेन्सेक्सचे केवळ 3 समभाग आज घसरणीसह बंद झाले. त्यातही सन फार्माचे शेअर्स 2.94 टक्क्यांनी घसरले. याशिवाय पॉवर ग्रिड आणि NTPC चे शेअर्स अनुक्रमे 0.1.86% ते 0.43% च्या घसरणीसह लाल रंगात बंद झाले.
खाली दिलेल्या चित्रात तुम्ही इतर सेन्सेक्स समभागांची स्थिती पाहू शकता-
2,010 समभाग घसरले –
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज, एकूण 3,945 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1,822 शेअर्स वाढीसह बंद झाले. 2,010 समभागांमध्ये घसरण दिसून आली. तर 113 समभाग कोणतीही हालचाल न करता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 222 समभागांनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 28 समभागांनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.