नवी दिल्ली : कोरोना विषाणूने बाधीत झालेल्या पहिल्या भारतीय महिलेला उपचारासाठी एक कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी तिच्या भावाने मदत गोळा करण्यास सुरवात केली आहे.
प्रिती माहेश्वरी असे या महिलेचे नाव आहे. त्या चीनमधील एका शाळेत शिक्षिका होत्या. त्यांचा भाऊ मनिष थापा यांनी बिजिंगमधील भारतीय दुतावासाकडे मदतीसाठी संपर्क साधला आहे. तसेच अन्य निधी देणाऱ्या संस्थांकडे उपचाराच्या खर्चासाठी संपर्क साधला आहे.
प्रिती यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या त्यांच्या उपचारासाठी 10 लाख चिनी युआन खर्च येत आहे. त्याची भारतीय चलनात किंमत एक कोटी रुपयांच्या जवळपास जाते. हा खर्च कुटुंबियांच्या आवाक्याबाहेरचा असल्याचे थापा यांनी सांगितले.