पुणे {प्रभात वृत्तसेवा} : शहरात उंड्री, बी. टी. कवडे रस्ता आणि मुंढवा या तीन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. मुंढवा येथील बंगल्यातील किचनला लागलेल्या आगीत आई आणि मुलगा जखमी झाल्याची घटना घडली.पहिली घटना उंड्री येथील होले वस्ती येथील पञ्याचे शेडमध्ये “एम के स्क्रॅप सेंटर” असून येथील भंगार मालाच्या साठ्याला आग लागली होती. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, उंड्री येथील होले वस्ती येथील पञ्याचे शेड मधील “एम के स्क्रॅप सेंटर” येथे भंगार मालाच्या साठ्याला लाग लागल्याची माहिती सकाळी ७ वाजून ५४ मिनिटांनी अग्निशमन दलाच्या नियंत्रण कशाला मिळाली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या वतीने गांभीर्य लक्षात घेऊन कोंढवा येथील २ अग्निशामक दलाचे २ बंब आणि १ वॉटर टँकर घटना स्थळी रवाना झाले होते.
पञ्याचे शेड असलेल्या गोडाऊनला आग लागली होती अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून २५ मिनिटात आग आटोक्यात आली. गोडावून मधील सगळे भंगारजळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशामक दलाच्या वतीने सांगण्यात आले. अग्निशमन अधिकारी कैलास शिंदे यांच्या १० जवानांनी आग आटोक्यात आणली.
दुसरी घटना बी. टी. कवडे रस्त्यावरील सोलेश पार्क सोसायटी येथील आवारात असणाऱ्या महावितरणच्या २०० के व्ही पॅनल बोर्ड व शेजारीच असणारे दोन डीपीने पेट घेतला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर पाण्याच्या मारा करत आगीवर नियंत्रण मिळवत धोका दुर केला.
तर मुंढवा येथील एका बंगल्याच्या किचन मध्ये लागलेल्या आगीत आई आणि मुलगा जखमी झाला असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. या आगीत अंजली ईश्वर सकत (वय- ५८), जतिन ईश्वर सकत (वय- ३२) असे जखमी झाल्याचे नाव आहे.
अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, मुंढवा रस्त्यावरील झगडे पार्क मधील संकल्प बंगलो येथे लाग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कशाला मिळाली. यानंतर कालकथित दयानंद सोनकांबळे अग्निशमन केंद्राच्या जवानांची घटना स्थळी जात पाहणी केली असता बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर वरील घरात, किचन मध्ये एल.पी. जी.सिलेंडर पेटला होता, तसेच किचन मधील लाकडी फर्निचर पेटले होते.
अग्निशामक सिलेंडरला लागलेली आणि किचन मधील आग विझविली. या घटनेत घरातील अंजली सकत यांच्या उजव्या हात, पाय आणि जतिन सकत याचा उजव्या हात, पाय भाजले असून या दोन्ही जखमींना दलाच्या जवानांनी खाजगी दवाखान्यात पाठविले भरती केले.
ही कामगिरी अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, तांडेल रणदिवे ,फायरमन जगताप, बीचकूले, कवडे, कांबळे यांनी तसेच हडपसर अग्निशमन केंद्रकडील तांडेल, शौकत शेख यांनी केली.