मुंबई – मुंबईतील वन अविघ्न इमारतीच्या ३५ व्या मजल्यावर अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. गेल्या वर्षी देखील याच इमारतीला अशाच प्रकारची आग लागली होती. आग लागताच अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.
अचानक ३५ व्या मजल्यावर लागलेल्या या आगींचे डोंब लांबूनही स्पष्टपने दिसून येत होते. गेल्या वेळेस या इमारतीत लागलेल्या आगीमुळे हाहाकार उडाला होता. त्यामुळे आता परिसरात आगीची बातमी समोर येताच भीतीचे वातारण निर्माण झाले. आज सकाळी साधारणतः पावणे अकराच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली
#MumbaiFire : #OneAvighnaPark : मुंबईतील वन अविघ्न पार्क इमारतीत पुन्हा एकदा अग्नितांडव, नेमकी कशामुळे आग लागली, हे अस्पष्ट, सध्या बचावकार्य सुरु, इमारतीत राहणाऱ्या नागरिकांमध्ये घबराट pic.twitter.com/opH4wnZUN8
— Siddhesh Sawant (@ssidsawant) December 15, 2022
आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरु आहेत. लागलेली आग ही लेव्हल १ ची आग असलयाचे देखील समोर आले आहे. दुसऱ्यांदा लागलेल्या या भीषण आगीमुळे रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत.