मुंबई – डिजिटल बॅंकिंग आणि एटीएममुळे ग्राहकांना अहोरात्र आर्थिक व्यवहार करता येत आहेत. मात्र तरीही पुढील आठवड्यात चार दिवस बऱ्याच बॅंक शाखांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.
केंद्र सरकारने काही सरकारी बॅंकांच्या खासगीकरणाचा मनोदय जाहीर केला आहे. त्याविरोधात 15 मार्च म्हणजे सोमवारी आणि 16 मार्च म्हणजे मंगळवारी काम बंद ठेवणार असल्याचे सरकारी बॅंक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे.
रविवारी 14 मार्चला सुट्टी आहे. त्याचबरोबर दुसऱ्या शनिवारी 13 मार्चला सुट्टी आहे. त्यामुळे हे चार दिवस सार्वनीक क्षेत्रातील बॅंकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.