जाणून घ्या वॉटरप्रूफ आणि वॉटर रेझिस्टंट फोनमध्ये नेमका काय फरक असतो?

एक काळ होता जेव्हा मोबाईल फोन अशा प्रकारे येत असत की जर ते पाण्यात भिजले तर ते खराब होण्याची खात्री असे. परंतु सध्या स्मार्टफोनचे युग आहे. असे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत, ज्यांना वॉटरप्रूफ मानले जाते. म्हणजेच ते फोन पाण्यात भिजले तरी काहीही होणार नाही. आजकाल विविध वैशिष्ट्यांसह सुसज्ज मोबाईल फोन बाजारात येऊ लागले आहेत. 

जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम वॉटरप्रूफ आणि वॉटर रेझिस्टंट फोनमधील फरक समजून घ्या, कारण बहुतेक लोकांना त्यांच्यातील फरक समजत नाही आणि अशा परिस्थितीत ते स्वतःचे नुकसान करतात. 

गेल्या वर्षी, ऍपल कंपनीलाही इटलीमध्ये आयफोन 12 वर खोटे वॉटर रेझिस्टंट दावे आढळल्याने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्यामुळे या दोन प्रकारातील नेमका फरक नक्कीच जाणून घ्यायला हवा.

वॉटर रेझिस्टंट म्हणजे काय?

सर्वप्रथम, हे जाणून घेणे महत्वाचे आहे की वॉटर रेझिस्टंट म्हणजे वॉटरप्रूफ नाही. वॉटर रेझिस्टंट असणे म्हणजे फोनच्या आत पाणी शिरणे अवघड आहे आणि फोनवर पाण्याचे काही थेंब पडले तरी फोन खराब होणार नाही. पण याचा अर्थ असा नाही की जर फोन पाण्यात पूर्ण बुडाला तर तो खराब होणार नाही, अशा स्थितीत फोन नक्कीच खराब होईल.

वॉटर रिपेलेंट म्हणजे काय?

वॉटर रिपेलेंट टेक्नॉलॉजीने सुसज्ज असलेले स्मार्टफोन म्हणजे फोनवर एक पातळ फिल्म लेप करण्यात येते, जी फोनमध्ये पाणी येऊ देत नाही. फोनमध्ये ही फिल्म आतून आणि बाहेरून लावली जाते. वॉटर रिपेलंट तंत्रज्ञानासाठी बहुतेक कंपन्या हायड्रोफोबिक पृष्ठभाग तयार करतात, जेणेकरून पाण्याचा फोनवर परिणाम होणार नाही. असे फोन सामान्य फोनपेक्षा जास्त काळ टिकू शकतात.

वॉटरप्रूफ म्हणजे काय?

असे अनेक स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत, ज्यावर वॉटरप्रूफ सर्टिफिकेशन देखील उपलब्ध आहे, म्हणजेच असे फोन पाण्यामध्येही सुरक्षित असतात. त्यांची खासियत अशी आहे की तुम्ही पाण्याखालीही फोटोग्राफीसाठी असा फोन वापरू शकता. म्हणून जेव्हाही तुम्ही फोन खरेदी करायला जाता, तेव्हा हे नक्की लक्षात ठेवा की तुम्ही घेत असलेला फोन वॉटरप्रूफ आहे की वॉटर रेझिस्टंट आहे की वॉटर रिपेलंट आहे. अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.