पैशांची तातडीची गरज भागवण्यासाठी आता सॅलरी ओव्हरड्राफ्टमधून सहज मिळतील पैसे ! कसे? जाणून घ्या…

पैशांची गरज कुणाला नाही? सध्याच्या काळात तर विविध कारणांमुळे जवळपास प्रत्येकालाच पैशांची गरज भासत असते. महागाईच्या या युगात अचानक कोणताही खर्च आला तर त्याला पैशाची वाट पाहणे कठीण होते. कर्ज काढून आपली अडचण दूर करणे हा सर्वात सोपा मार्ग असला तरी त्यासाठी वेळ, विविध सोपस्कार करावे लागतात. 

तसे तर बँका ग्राहकांना विविध सुविधा पुरवतात. एटीएम, कर्ज, डेबिट-क्रेडिट कार्ड बद्दल प्रत्येकाला माहिती आहे, पण बँकेच्या काही अशाही सुविधा आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. बँका त्यांच्या ग्राहकांना पगाराच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा देखील देतात. त्याच्या मदतीने, आपण आपल्या गरजा पूर्ण करू शकता. पैशांची तातडीची गरज भागविण्यासाठी पगाराच्या ओव्हरड्राफ्टची सुविधा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

सॅलरी ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय?

सॅलरी ओव्हरड्राफ्ट हे एक प्रकारचा रिवॉल्विंग क्रेडिट आहे. ही सुविधा पगार खात्यांवर उपलब्ध आहे. या अंतर्गत, जेव्हाही तुम्हाला अतिरिक्त पैशांची आवश्यकता असेल, तेव्हा तुम्ही तुमच्या पगार खात्यातून अधिक रक्कम काढू शकता. सुविधेअंतर्गत, तुम्ही खात्यात असलेल्या रकमेइतकी किंवा त्यापेक्षाही जास्त रक्कम बँकेतून काढू शकता. 

तुम्ही तुमच्या पगारापेक्षा तिप्पट पैसे बँकेतून घेऊ शकता. सोप्या भाषेत, तुमच्या खात्यात शिल्लक नसले तरीही तुम्ही यापेक्षा जास्त पैसे काढू शकता. म्हणजे, आपत्कालीन परिस्थितीत जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्हाला यापुढे काळजी करण्याची गरज नाही.

व्याज भरावे लागते

सॅलरी ओव्हरड्राफ्ट हा कर्जाचा एक प्रकार आहे, जो तुमच्या रेकॉर्डच्या आधारावर दिला जातो. त्याची परतफेड केल्यावर तुम्हाला व्याज भरावे लागेल. हा ओव्हरड्राफ्ट प्री-अप्रूव्ड म्हणजेच पूर्व-मंजूर आहे. त्याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा व्याज दर क्रेडिट कार्ड पेक्षा कमी आहे. पगाराच्या ओव्हरड्राफ्टबाबत प्रत्येक बँकेचे स्वतःचे नियम आहेत.

काही बँका तुमच्या पगाराच्या दोन ते तीन पट ओव्हरड्राफ्ट सुविधा देतात, तर काही बँका ही सुविधा मासिक पगाराच्या फक्त 80 ते 90 टक्के पर्यंत देतात.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.