पिंपरी – गरीबाला न्याय द्या, वंचितांचे अश्रू पुसा, माणसातला देव शोधा आणि पुण्याचे पारडं जड करा, असा संदेश आमदार निलेश लंके यांनी आपल्या भाषणातून दिला.
उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांचा पारनेर, शिरुर, जुन्नर, आंबेगाव रहिवासी आम्ही पुणेकर मित्र परिवारातर्फे जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. आज सोमवारी (दि. 2) पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात आमदार लंके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी शिरुर नगरपालिका माजी नगराध्यक्षा मनिषा गावडे, अनिता रामदास जगताप, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त बाबाजी गावडे, जितेश सरडे, वन परिक्षेत्र अधिकारी संतोष चव्हाण, सेवा निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जनता सह बॅंकेचे माजी संचालक बिरुशेठ खोमणे, संजय पिंगट, नवनाथ निचित, तुकाराम डफळ, महेंद्र पवार, महेंद्र मुंजाळ, अभय नांगरे, शहाजी पवार, डॉ. भानुदास कुलाल, रभाजी खोमणे, शिवाजी गावडे, बाबू निचित, सचिन हिलाळ आदी उपस्थित होते.
जगताप यांनी आपल्या आव्हानात्मक महसुली सेवाकालाचा आढावा घेत सहकार्य केलेल्यांची कृतज्ञता व्यक्त केली. महसूल विभागाच्या डिजिटल क्रांती ठरलेल्या ई फेरफार प्रकल्पाचा राज्य समन्वयक म्हणून सलग 6 वर्षे काम केले. त्याचा लाखो नागरिक दररोज लाभ घेत आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक बाळासाहेब घोडे गुरुजी यांचाही सन्मान करण्यात आला.
समाजरक्षक पोलीस कर्मचारी अधिकारी तसेच लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवून निवड झालेले अधिकारी, उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी आणि शिष्यवृत्ती प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचाही या प्रसंगी सन्मान करण्यात आला.
प्रास्ताविक संभाजी साबळे यांनी केले. राजेंद्र शिनारे यांनी सूत्रसंचालन केले. सुनिल चोरे यांनी आभार मानले.