Ram Mandir – गेल्या काही दिवसांपासून राममंदिर उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते. उद्धव ठाकरेंना राममंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नसल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
मात्र, अखेर उद्धव ठाकरे यांना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. हे निमंत्रण उद्धव ठाकरेंना स्पीड पोस्टद्वारे पाठवण्यात आल्याची माहिती समजते.
पण उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाले असले तरीही ते 22 जानेवारी रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार आहेत. त्यामुळे ते या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे याआधीच उद्धव ठाकरेंकडून स्पष्ट करण्यात आले आहे.