पुणे – प्रेमविवाह झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात झाला. यानंतर पोलिसांनी संबंधीत मुलीच्या पतीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नवाज ईब्राहिम शेख(28,रा.भवानी पेठ ) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 17 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.
एक अल्पवयीन मुलगी डिलेव्हरीला आल्यावर तीचा गर्भपात झाल्याची एका रुग्णालयाने समर्थ पोलिसांना दिली होती. यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, संबंधीत मुलीने प्रेमविवाह केला असल्याचे सांगितले. मात्र ती अल्पवयीन असल्याने पतीवर बाल लैंगिक अत्याचार कायद्या (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. संबधीत मुलीने खरच प्रेमविवाह केला आहे का ? याची चौकशी करण्यात येत आहे. तीचा जबरदस्तीने विवाह झाला असल्यास बाल विवाहाचाही गुन्हा दाखल होऊ शकतो. याप्रकरणाचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक तेजू पाटील करत आहेत.