मेथीतून तीस दिवसांत पन्नास हजारांचे उत्पन्न

पेरणीसाठी एकरी अवघा 20 हजार खर्च; 70 किलो बियाणांचा वापर
पेठ (वार्ताहर) – येथील परिसरातील शेतकऱ्याने मेथीच्या पिकातून तीस दिवसांत पन्नास हजार कमावले असून, या पिकांतून मिळालेल्या उत्पन्नामुळे त्याच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.

रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या समाविष्ट केल्यामुळे उत्तम आरोग्याला चालना मिळते. मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथीला शहरी भागात चांगली मागणी आहे. हे पाहता ग्रामीण भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पेठ (ता. आंबेगाव) मधील तरुण शेतकरी विशाल तोडकर यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवत अनेक प्रकारचे चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. पेप्सी कंपनीच्या बटाटा काढणीनंतर त्यांनी लगेच त्याच शेतामध्ये पुकराज या जातीच्या बटाटे बियाणे लावून त्याचे यशस्वी उत्पादन घेतले होते.

आता तिसऱ्यादा त्याच शेतामध्ये सत्तर किलो मेथी बी टाकून मेथीचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. मेथी बियाणे, औषधे फवारणी, खते असा एकूण वीस हजार खर्च झाला. एक एकर शेतामध्ये आलेली मेथी जागेवरच व्यापाऱ्यांना सत्तर हजार रुपयेमध्ये उक्ती देऊन टाकली. सर्व खर्च वजा जाता त्यांनी तीस दिवसांत पन्नास हजाराचा निव्वळ कमविले आहेत. विशेष म्हणजे हा तरुण शेतकरी स्वतःचा हॉटेल व्यवसाय साभाळून शेतीमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करीत असतो.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.