मुंबई – दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रकाश आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा अलीकडेच घटस्फोट झाला आहे. त्यानंतर या सेलिब्रिटी कपलमधील मतभेदाच्या बातम्या खूप रंगायला लागल्या होत्या. स्वतः समंथा आणि नागा चैतन्य यांनी सोशल मीडियावर एक अधिकृत पोस्ट शेअर करत आपल्या नात्यातील दुरावा चाहत्यांशी शेअर केला होता.
मात्र, काही दिवसांपूर्वी असं म्हंटलं जात होत की या दोघांच्या नात्याबद्दल प्रसिद्ध अभिनेते आणि नागा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी आपले मत व्यक्त केले होते. पण ही अफवा असल्याचं आता स्वतः नागार्जुन आयांनी सांगितलं आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
The news in social media and electronic media quoting my statement about Samantha & Nagachaitanya is completely false and absolute nonsense!!
I request media friends to please refrain from posting rumours as news. #GiveNewsNotRumours— Nagarjuna Akkineni (@iamnagarjuna) January 27, 2022
आपल्या पोस्टमध्ये नागार्जुन लिहितात… ‘सोशल मीडिया समंथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्याबद्दल मी प्रतिक्रिया दिली… अशी माहिती देण्यात आली. हे अत्यंत चुकीचे आहे. मी मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व मित्रांना रिक्वेस्ट करतो की ही अफवा लोकांपर्यंत पोहचवू नका.’ त्याच बरोबर त्यांनी पोस्टमध्ये #GiveNewsNotRumours या हॅशटॅगचा देखील वापर केला आहे.’ असं अभिनेते नागार्जुन म्हणाले आहे.