बॉलिवूड स्टार पार्टी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पार्टी जर गर्लच्या गँगसोबत असेल तर मजा काही औरच असते. बॉलीवूडची सर्वात प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने देखील तिच्या गर्ल गँगसह खूप धमाल केला, ज्याची एक झलक तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केली. फराह खानने शेअर केलेले व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला तो मात्र वेगळ्याच कारणाने.
View this post on Instagram
फराह खानच्या गर्ल गॅंग पार्टीत अभिनेत्री हुमा कुरेशी, अदिती राव हैदरी आणि पत्रलेखा यांचा समावेश होता. फराहने तिच्या सर्व अभिनेत्रींसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये दोन्ही अभिनेत्री एका रेस्टॉरंटमध्ये प्लेट्स फोडताना दिसत आहेत. मात्र ह्या प्लेट्स त्या का फोडत आहेत हे कळू शकले नाही.
View this post on Instagram
दरम्यान, हुमाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या पार्टीतील एक फोटो देखील शेअर केला आहे. फोटोमध्ये हुमा कुरेशी, फराह खान आणि अदिती राव हैदरी काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. तर पत्रलेखा पांढऱ्या प्रिंटेड ऑफ शोल्डर टॉप आणि डेनिम्समध्ये सुंदर दिसत आहे.