बंगळुरू – सेक्स सीडी प्रकरणामुळे कर्नाटकमधील राजकारण ढवळून निघालं आहे. या प्रकरणामुळे येथील जलसंपदामंत्र्याला मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्या होता. एका मुलीने या मंत्र्यासोबतचा अश्लील व्हिडिओ शेअर करत अत्याचाराचे आरोप केले होते. मात्र आता या मुलीचं अपहरण झाल्याचं सांगण्यात येत आहे.
युवतीला सरकारी नोकरीचं आमिष देवून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप भाजपनेते आणि जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यावर लावण्यात आला होता. त्यांचा व्हिडीओ काही कन्नड भाषिक वृत्तवाहिन्यांनी चालवला होता. आता या प्रकरणाला एक वेगळं वळणं लागलं असून प्रकरणातील संबंधित महिलेचं अपहरण झालं असल्याचा दावा पिडितेच्या आई वडिलांनी केला आहे.
पीडितेच्या आई-वडिलांनी आज तक्रार दाखल केली असून तिच्या आणि आमच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं. 2 मार्च रोजी आपल्या मुलीचं अपहरण झालं असल्याचा दावा पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे. याच दिवशी संबंधित तथाकथित सेक्स सीडी उघडकीस आली होती. याच दिवशी आपण आपल्या मुलीशी शेवटचं बोललो असा दावाही पीडितेच्या वडिलांनी केला आहे.