Gold Rate Today | सोन्याच्या दरात झाली वाढ

जागतिक बाजारात भाव वाढल्याचा परिणाम

नवी दिल्ली – सोन्याचे दर सध्या कमी पातळीवर असल्यामुळे काही गुंतवणूकदाराकडून खरेदी होत आहे. त्यामळे जागतीक बाजाराबरोबरच भारतीय बाजारातही सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचे दर 60 रुपयांनी वाढून 44,519 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मात्र तयार चांदीचा भाव 200 रुपयांनी कमी होऊन 66,536 रुपये प्रति किलो झाला.

एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात आणि वायदे बाजारात सोन्याचे दर वाढत असल्यामुळे त्या प्रमाणात भारतीय बाजारात सोन्याचे दर गेल्या तीन दिवसापासून वाढत आहेत.

जागतिक बाजारपेठेत सोन्याचे दर कमी होऊन 1,735 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 26 डॉलर प्रति औंस आहेत. मात्र ही वाढ माफक स्वरूपातील आहे. सोन्याचे दर आणखी 45 हजार रुपयापेक्षा कमी आहेत. भारतामध्ये लग्नासाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी वाढत आहे. कारण सध्याच्या पातळीवर सोने खरेदी ग्राहकांना किफायतशीर वाटत आहे.

सरकारी रोख्यांवरील वाढणारा परतावा, सुधारत असलेली आर्थिक परिस्थिती आणि महागाई या कारणामुळे डॉलर वधारत आहे. परिणामी सोन्याचे दर कमी पातळीवर आहेत. नजीकच्या भविष्यामध्ये सोन्याचे दर फार प्रमाणात वाढणार नाहीत, असे काही विश्‍लेषकांनी सांगितले आहे. आठ महिन्यापूर्वी भारतात सोन्याचे दर 58 हजार रुपयांपर्यंत वाढले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.