पिरंगुट- मुंबई व विशेषतः रेड झोनमधून मुळशी तालुक्यात रहिवासासाठी येणाऱ्या नागिरकांना आता होमक्वारंटाइन व्हावे लागणार आहे, अशी माहिती तहसीलदार अभय चव्हाण यांनी दिली, तसे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहे.
सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे. मुंबई व पुण्यातही याच मोठा उद्रेक झालेला आहे. याठिकाणी अनेक भागात रेड झोन जाहीर केला आहे. मुळशीतील विविध गावांतील अनेक नागरिक कामधंदा व व्यवसायानिमित्त पुणे व मुंबईत वास्तव्यास आहे. करोनाच्या धास्तीने मुळशी तालुक्यात विविध गावांत वास्तव्यास असलेले अनेक नागरिक आपल्या मूळ गावी जात आहेत.
तसेच मुळशी तालुक्याच्या बाहेर असलेले अनेक नागरिक आपल्या गावी परतत आहेत. तालुक्यात येणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीने तलाठी व पोलीस पाटील यांच्या मदतीने होमक्वारंटाइन करून त्यांच्या हातावर शिक्के मरायला सांगितले आहेत. ज्या व्यक्ती होमक्वारंटाइन होण्यास व शिक्के मारून घेण्यास नकार देतील अशांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.