लखनौ – माजी पोलीस आयुक्त आणि भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असीम अरुण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. दरम्यान या घटनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी दिली.
प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांचा पक्षात समावेश केला. तुरुंगात असलेले समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांचा मुलगा अब्दुल्ला आझम यांचे नाव घेऊन समाजवादी पक्षावर निशाणा साधला आणि दंगेखोर सपामध्ये जातात. दंगल करणारे सपामध्ये जातात, जे दंगलखोरांना पकडतात ते भाजपामध्ये जातात. हा सपाच्या समाजवादाचा खरा खेळ आहे. उमेदवार एकतर तुरुंगात जातो किंवा जामिनावर बाहेर येतो. सपाने घोषित केलेल्या उमेदवारांपैकी एक नाहिद हसन तुरुंगात आहे आणि त्यांचे दुसरे आमदार अब्दुल्ला आझम जामिनावर आहेत. जेल आणि जामिनाचा खेळ हा समाजवादी पक्षाचा खरा खेळ आहे, असे अनुराग ठाकूर म्हणाले.
असीम अरुण यांनी मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले. ज्यांनी राज्यभरात कायद्याचे चांगले वातावरण निर्माण केले आणि पोलीस अधिकारी किंवा सर्वांना प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा दिली त्यांचे आज मी आभार मानतो. आज मला भाजपामध्ये काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि मी येथेही माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करेन, असे असीम अरुण यांनी म्हटले.
तक्रार करणार
या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहेत. असीमसह भाजपामध्ये सामील झालेल्या सर्व पोलिस अधिकाऱ्यांना काढून टाकावे कारण त्याचा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.