उस्मानाबाद – पती-पत्नीचे नाते विश्वासावर टिकून असते. मात्र अनेकदा एकमेकांवरील संशयावरून अनेक संसार मोडले आहेत. तर काही ठिकाणी हत्या आणि आत्महत्याही झाल्या आहेत. चारित्र्याच्या संशयावरून नवीन प्रकरण समोर आले आहे. 21 व्या शतकात पतीने पत्नीला अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडले असून यात पत्नी जखमी झाली आहे. उस्मानाबाद येथील ही घटना आहे.
चारित्र्याच्या संशयावरुन पतीने आपल्या पत्नीला अग्निपरीक्षा देण्यास भाग पाडलं आहे. या व्यक्तीनं आपल्या पत्नीला उकळत्या तेलात हात घालून पाच रुपयांचं नाणं काढायला लावलं आहे. पत्नीसोबत केलेल्या या अमानुष कृत्याचा त्यानं स्वतःच व्हिडीओ देखील बनवला आहे. मागील अनेक दिवसांपासून ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे कळत नव्हतं. अखेर हा व्हिडिओ उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान पाच दिवस अत्याचार सहन केल्यानंतर पीडित महिलेने म्हटलं की, बदनामीच्या भीतीने आपण आग्निपरीक्षा दिली. तसेच आपण दिलेली अग्निपरीक्षा जगाला माहित व्हावी, म्हणून व्हिडिओ तयार केल्याचे महिलेने सांगितले. या प्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.