#लोकसभा2019 : देशात चौथ्या टप्प्यात सांयकाळी 5 वाजेपर्यंत 50.60 % मतदान

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी 13-13 जागा, पश्चिम बंगालमधील 8 जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील 6-6 जागा, बिहारमधील 5 जागा, झारखंडतील 3 जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

सांयकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी समोर आली असून देशात सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण सरासरी 50.60 टक्के मतदान झाले आहे.

9 राज्यांतील मतांची टक्केवारी (दुपारी 5 वाजेपर्यंत)

बिहार – 44.33 %
जम्मू आणि काश्मीर – 9.37%
झारखंड – 57.13%
मध्यप्रदेश – 57.77%
महाराष्ट्र – 42.52%
ओडिशा – 53.61%
राजस्थान – 54.75%
उत्तर प्रदेश – 45.08%
पश्चिम बंगाल – 66.46%

एकूण : 50.60%

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.