अभिनेत्री ईशा देओल आणि तिची बहीण अहाना देओल, लोकसभा निवडणूक 2024 च्या दरम्यान उत्तर प्रदेशातील मथुरा येथे प्रचारासाठी त्यांची आई हेमा मालिनी यांच्यासोबत सामील झाल्या. ईशा मथुरेतील पर्यटनाबाबत माध्यमांशी बोलताना दिसली. मात्र, नेटिझन्सनी तिच्या ओठांची दखल घेतली. तिच्यावर लिप फिलर केल्याचा आरोप आता युजर्स करत आहे. यावरून तिला ट्रोलही केले जात आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच एका यूजरने ‘सगळं सोडा, ईशा देओलच्या ओठांना काय झालं?’ असा प्रश्न विचारला आहे तर तर दुसऱ्या एक लिहिले आहे, ‘आम्ही फक्त तिच्या ओठांवर वाढ पाहू शकतो.’
अलीकडेच, अभिनेत्रीने लग्नाच्या 11 वर्षांहून अधिक काळानंतर पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याची पुष्टी केली. “आम्ही परस्पर आणि सौहार्दपूर्वक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतला आहे.’ असे सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते.
ईशा देओल शेवटची ‘हंटर टूटेगा नहीं तोडेगा’मध्ये सुनील शेट्टी, बरखा बिश्त, करणवीर शर्मा आणि राहुल देव यांच्यासोबत दिसली होती. ईशा आणि भरत तख्तानी आधी आंतरशालेय स्पर्धेदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले आणि नंतर 2012 मध्ये लग्न केले. त्यांना राध्या आणि मिराया या दोन सुंदर मुली आहे.