पिंपरी, दि. 14 (प्रतिनिधी) – मोशी येथील सुरज महादू मसुरे यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. मोरवाडी, पिंपरी येथील वंचित बहुजन आघाडीच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात हा पक्ष प्रवेश पार पडला. वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश करण्यात आला.
या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडी शहर महासचिव संजीवन कांबळे, उपाध्यक्ष कचरू ओव्हाळ, धनंजय कांबळे, भारत कुंभारे, किरण हिंगणे, महिला आघाडी उपाध्यक्षा अर्चना गायकवाड, महिला कोषाध्यक्षा शारदा बनसोडे, सचिव संतोष कसबे, राजु चांदणे, माजी प्रवक्ता के. डी. वाघमारे, कोषाध्यक्ष राजेश बारसागडे, साने चौक शाखा अध्यक्ष सचिन ओव्हाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपास्थित होते.
या वेळी वंचित वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी सुरज मसुरे यांच्यासह त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.