पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित केलेले शाहुनगर येथील कै. अटल बिहारी वाजपेयी उद्यान, पिंपळेगुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यान आणि संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यान लेजर शो नागरिकांसाठी नुकताच खुला करण्यात आली आहेत. या उद्यानातील प्रवेशासाठी 12 वर्षाखालील मुलांना 10 रुपये तर प्रौढांसाठी 20 रुपये फी असणार आहे.
सोमवार (दि.11) पासून उद्याने सर्व नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत उद्यान खुले ठेवण्यात येणार आहे. तर, बर्ड व्हॅली उद्यान लेजर शो सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुले ठेवण्यात येणार आहे.
महापालिकेच्या उद्यान वृक्षसंवर्धन विभागासाठी व्हर्टीकल गार्डनसाठी प्लॅस्टिक पॉट स्टॅंन्डसह साहित्य खरेदी करण्यात येणार आहेत. निविदा रक्कम 41 लाख रुपयांची होती. जे.बी.एन्टरप्रायजेस यांची निविदा रकमेपेक्षा 21.96 टक्के कमी दराची निविदा आली. 1 महिन्यासाठी येणारा 31 लाख 99 हजार 640 रुपये आणि अधिक जीएसटीसह जी.बी. एन्टरप्रायजेस यांची निविदा स्वीकारली. करारनामा करण्यास आणि 1 महिने कालावधीसाठी येणाऱ्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली.
72 लाखांचे लिटर बिन्स खरेदी करणार
महापालिका उद्यान विभागासाठी आवश्यक स्टेनलेस स्टील सिंगल हॅंगिंग लिटर बीन्स खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी 5 निविदाधारक पात्र झाले. त्यापैकी इंद्रनील टेक्नोलॉजीस या पुरवठादाराने प्रतिनग 7 हजार 245 याप्रमाणे 1 हजार नगांकरीता 72 लाख 45 हजार रुपयांचा दर दिला. अंदाजपत्रकीय 1 कोटी 13 लाख 25 हजार रुपयांपेक्षा इंद्रनील टेक्नोलॉजीस यांचे दर 36.06 टक्क्यांनी कमी प्राप्त झाले आहेत. त्यानुसार त्यांच्याकडून स्टेनलेस स्टिल सिंगल हॅगिंग एस.एस (304) लिटर बिन्स खरेदी करण्यात येणार आहेत. 72 लाख 45 हजार रुपये खर्चास आयुक्त राजेश पाटील यांनी मान्यता दिली.