मुंबई – बॉलीवूडमध्ये मलायका अरोराचे सौंदर्य, फिटनेस आणि चिरतारुण्याची चर्चा नेहमीच असते. वयाच्या ४८व्या वर्षी देखील मलायकाचा जलवा कायम आहे. आपल्या हॉट आणि मादक सौदर्याने आजच्या आघाडीच्या अभिनेत्रींना देखील मालयकाने मागे टाकले आहे. बॉलिवूडची ही अभिनेत्री फिटनेस आणि बोल्ड लुकमुळे सतत प्रसिद्धीच्या झोतात असते. सोशल मीडियावर सुद्धा मालयकाचे लाखो फॅन्स आहेत.
सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओमुळे तिला नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला असून फोटोग्राफरला चांगलेच सुनावले आहे. नुकतंच बॉलिवूडमधील गर्ल गँग मलायका अरोरा, करीना कपूर खान आणि अमृता खान या मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये लंचसाठी गेल्या होत्या.
View this post on Instagram
त्यावेळी मलायकाने काळ्या रंगाची पँट आणि बॅकलेस टॉप परिधान केला होता. या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट दिसत आहे. त्यावेळी काही फोटोग्राफर्सने तिचा व्हिडीओ शूट केला. या व्हिडीओमध्ये ती रेस्टॉरंटमधून निघून तातडीने गाडीत जाऊन बसते. गाडी बसताना फोटोग्राफरने चुकीच्या पद्धतीने व्हिडीओ केल्यामुळे मलायकाचे चाहते फोटोग्राफरवर संतापले आहेत.
मालयकाच्या या व्हिडिओवर एका नेटकाऱ्याने “अरे तुम्ही कुठेही कॅमेरा झूम का करता…’ असं म्हणत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्याने तुम्हाला लाज वाटली पाहिजे… असे झूम करता..’ असं म्हंटलं आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.