स्वादिष्ट भोजनासाठी उत्तम मसाल्यांची गरज असते. या मसाल्यांमध्ये तमालपत्र तर अगदीच आवर्जून असायला हवे. फोडणीतील केवळ उपस्थितीने पदार्थांचा स्वाद आणि सुवास द्विगुणित करणाऱ्या तमालपत्राचे फायदे आपल्या त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य वाढविण्यासाठी देखील होऊ शकतो, असे कुणी सांगितले तर विश्वास ठेवाल? होय, आज आम्ही तुम्हाला सांगतोय तमालपत्राने आपलं सौंदर्य कसे वाढते, याबाबत. तमालपत्राने कोणते फायदे मिळतात, हे जाणून घ्या.
तमालपत्राचे फायदे :
चेहऱ्यावर डाग, पुरळ, मुरूम असल्यास तमालपत्र खूप फायदेशीर आहे. तमालपत्राचे लेप किंवा तमालपत्र पाण्यात उकळून त्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहरा स्वच्छ होतो आणि डाग नाहीसे होतात.
तमालपत्राचं पाणी सूर्याच्या किरणांनी प्रभावित झालेल्या त्वचेलादेखील बरे करण्यास मदत करतं आणि त्वचेचा रंगदेखील एकसारखा ठेवण्यास मदत करतं.
केसांना कोमल आणि मऊ आणि चमकदार ठेवण्यास तमालपत्राचा वापर फायदेशीर आणि प्रभावी आहे. तमालपत्र तेलात घालून तेल केसांच्या मुळात लावू शकता, किंवा याच्या पाण्याने केस धुऊ शकता.
तमालपत्राचा लेप बनवून केसात लावल्यानं कोंडा नाहीसा होतो. या लेपाला दह्यात मिसळून लावू शकता, जेणे करून डोक्याची त्वचा ओलसर राहील आणि पोषण देखील मिळेल.
तमालपत्र कोरडं वाटून त्याची भुकटी मंजनप्रमाणे वापरल्यानं, दात पांढरे करण्यासाठी आणि चमक टिकवून ठेवण्यासाठी प्रभावी असतं. आठवड्यातून एकदा हे वापरू शकता.