तेहरान – इराणला आण्वस्त्रसज्ज बनवण्यासाठी महत्वाची भुमिका बजावणारे सर्वात वरीष्ठ आणू संशोधक आणि अमेरिकन आणि इस्रायली गुप्तचरांच्या दीर्घकाळ रडारवर असणारे मोहसीन फक्रिझादेह यांची त्यांच्या अंगरक्षकाह तेहरान शहराच्या बाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
तेहरानपासून 40 मैल अंतरावर असणाऱ्या अबसरद शहरात रस्त्याच्या कडेला मोहसीन फक्रिझादेह यांचे मारेकरी दबा धरून बसले होते. मोटार येताच त्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हत्येची त्या सरकारने प्रकाशित केलेल्या छायाचित्रांवरून त्यांच्या मोटारीच्या काचांची गोळ्या घालून चाळणी करण्यात आली. गाडीचे पत्रे रस्त्यावर सर्वत्र विखुरले होते. रक्ताचा सडा पडलेला होता.
प्रख्यात इराणी शास्त्रज्ञाची दहशतवाद्यांनी केली. या भ्याड कृत्याने (त्यात इस्राईलचा गंभीर सहभाग दर्शवते) कट आखणाऱ्या युध्दपिपासूंचे नैराश्य दर्शवते, असे ट्विट इराणचे परराष्ट्र मंत्री महंमद जावेद झरीफ यांनी केले आहे. झरीफ यांनी आंतरराष्ट्रीय समुदायांनी त्यांची दुहेरी निष्ठा संपवायला हवी. या दहशतवादी कृत्याचा निषेध करायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
शहीद मोहसीन फक्रिझादेह यांच्या हत्यांना जबाबदार असणाऱ्यांना शोधून धडा शिकवेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे इराणचे लष्करप्रमुख महंमद बाघेरी यांनी म्हटले आहे. इराणने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेर्रस यांना शुक्रवारी पत्र पाठवले आहे. आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व त्या उपाय योजना करण्याचा अधिकार इराण राखून ठेवत आहे, असा इशारा त्यात देण्यात आला आहे.
ओबामा प्रशासनाच्या काळात अमेरिकन गुप्तचर खात्याचे प्रमुख असणारे जॉन ब्रेनन यांनी हत्येची संभावना गुन्हेगारी बेपर्वा कृत्य, अशी केली आहे. त्यामुळे युध्दाला सुरवात होण्याची भीती आहे. त्यातून विभागीय संघर्ष सुरू होऊ शकतो, असे ट्विट करून त्यांनी म्हटले आहे, इराणने अमेरिकेत जबाबदार नेतृत्व येईपर्यंत वाट पहायला हवी. पलटवार करण्याची घाई करण्यापासून रोखायला हवे.
पेंटॅगॉनचे मध्य पुर्वेतील धोरण निश्चिती करणारे माजी वरीष्ठ अधिकारी मायकेल मुलरॉय म्हणाले, फक्रिझादेह यांच्या मृत्यूने इराणच्या आण्विक कार्यक्रमाला खीळ बसेल. हा संशोधक इराणच्या लष्करातील वरीष्ठ अधिकारी होता. त्यामुळे इराणच्या ताकदीने उत्तर देण्याच्या वृत्तीला चालना मिळू शकते.
मोहसीन फक्रिझादेह यांच्या नेतृत्वाखाली इराण गोपनीय पध्दतीने आण्विक कार्यक्रम राबवत असल्याच आरोप अमेरिका आणि इराण गेले दोन दशके करत आहे. 2003 मध्ये अणूबॉम्ब बनवण्याच्या जवळ पोहोचला होता. मात्र त्यांचे संशोधन इस्रायली गुप्तचरांनी पळवून नेल्याचे मानण्यात येते.
या संशोधकाच्या हल्ल्याच्या मागे इस्रायल आहे. या करावाईची अमेरिकेला आधीपासून पूर्वकल्पना होती का नाही याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. मात्र या दोन देशांत इराण संबंधातील गुप्तचरांच्या महितीची सर्वात अधिक देवाण घेवाण करण्यात येत आहे. इस्रायल इराणला सर्वात मोठा धोका समजते, असे एका अमेरिकन अधिकाऱ्याने दोन गुप्तचर अधिकाऱ्यांसह सांगितले.
मोहसीन फक्रिझादेह यांची हत्या हे दहशतवादी कृत्य असल्याची टीका इराणने केली आहे. त्याचा बदला घेतला जाईल, असे म्हटले आहे. आमचा अणू कार्यक्रम हा शांततेसाठी होता. शस्त्र बनवण्यासाठी नव्हता, असेही स्पष्ट केले आहे.
मोहसीन फक्रिझादेह यांच्या हत्येबाबत व्हाईट हाऊस, सीायए आणि इस्रायली अधिकाऱ्यांनी या हत्येबाबत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेने 10 महिन्यांपुर्वी इराणी गुप्तचर संघटनेच्या प्रमुखाची ड्रोनद्वारे हत्या केली होती. या दोन्ही हत्यांमुळे इराणचा आण्विक कार्यक्रम संपवण्यासाठी ज्यो बायडेन यांनी 2015 मध्ये इराण आणि अन्य सहा देशांशी केलेल्या करारामध्ये गुंतागूंत निर्माण झाली आहे. बायडेन यांच्या हस्तांतरण पथकाने त्यामुळेच यावर तातडीने भाष्य केले नाही.