दोरीने पाय बांधलेले, तोंडावर चिकटपट्टी; कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या 85 वासरांची ‘अशी’ झाली सुटका

चौफुला – इंदापूर येथे एका टेम्पोतून कत्तलीसाठी वासरे भरून नेण्यात येत होतो. हे वाहन पकडण्यात आले असून, या टेम्पोत 85 वासरे दाटीवाटीने कोंबल्याचे आढळून आले. या सर्व वासरांची सुटका करण्यात आली असून, त्यांची रवानगी चौफुला (ता. दौंड) येथील बोरमलनाथ गोशाळेत करण्यात आली आहे.

इंदापुरातून एका टेम्पो आयशर टेम्पो (एमएच-45.0970) तून कत्तलीसाठी वासरे घेऊन जात असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी श्री शिवशंकर स्वामी यांना समजल्य इंदापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजावर यांना देऊन कायदेशीर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली.

यावेळी मुजावर यांनी तातडीने नाकाबंदी करून वाहनांची पाहणी करून टेम्पो ताब्यात घेतला असता टेम्पोमध्ये दोन मजले करून 85 वासरांचे चारही पाय दोरीने बंधून, तोंडे चिकटपट्टीने चिटकवले असल्याचे आढळले. टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करून सर्व वासरे चौफुला येथील श्री बोरमलनाथ गोशाळेत सुखरूप सोडण्यात आले. चौफुलातील गोशाळेचे प्रमुख कैलास शेलार यांनी त्या वासरांची सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.