थिरूवनंतपूरम – केरळात असलेले आठ विदेशी नागरिक करोनातून बरे झाले आहेत. हे नागरिक इटाली आणि ब्रिटनचे आहेत. मुख्यमंत्री विजयन यांनी सांगितले की, त्यांच्यावर केरळातील सरकारी इस्पितळात उपचार सुरू होते आता ते यातून बाहेर आले आहेत. हे रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत होते. पण सुदैवाने चांगल्या उपचारामुळे ते वाचले आहेत.
दरम्यान गुरुवारी केरळात करोनाच्या 12 नवीन केसेस आढळून आल्याने राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या 357 झाली आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी कन्नुर आणि कासरगोड जिल्ह्यात प्रत्येकी चार जण आढळून आले असून मल्लापूरम जिल्ह्यात दोन केसेस आढळून आल्या आहेत. कोल्लम आणि थिरूवनंतपूरम जिल्ह्यातही प्रत्येकी एकेक रुग्ण आढळून आला आहे.