मांजरी – केशवनगर व मांजरी बुद्रुक येथे मांजरी बुद्रुक ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमितआबा घुले व वृक्षगजानन संस्थेमार्फत एक उत्कृष्ट असा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. वृक्षगजानन ही एक उत्कृष्ट अशी संकल्पना आहे. वृक्षगजानन मध्ये हाताने कोरीव काम केलेल्या सर्वांगीण सुंदर आणि सुबक अश्या श्रींच्या मुर्त्या आहेत.
वृक्षगजानना मध्ये श्रींच्या पुर्णपने शेतमातीपासुन बनवलेल्या मूर्त्या आहेत.या मुर्त्या आपण घरच्याघरीच विसर्जन करु शकतो ३० ते ४५ मिनिट मध्ये मूर्तीचे विसर्जन होते यामुळे कोणतीही पर्यावरण हाणी होणार नाही या मुर्त्या पर्यावरणपूरक आहेत. वृक्षगजानन चे पूर्ण पॅकेज आहे त्यामधे तुम्हाला एक मातीने भरलेली कुंडी, चंदेरी पाट व कृष्णतुळशीचे बी या सर्व वस्तु त्या पॅकेज मध्ये समाविष्ट आहे. यामुळे पर्यावरणाला कोणतिही हाणी होणार नाही व आपल्याला या कोरोनाच्या महामारी मध्ये मूर्ति विसर्जनासाठी घराच्या बाहेर निघण्याची गरज ही नाही.
नगरसेविका उज्वला सुभाष जंगले यांच्या हस्ते स्टॉलचे उद्घाटन झाले .यावेळी भाजपा सरचिटणीस संदीप लोणकर, जिल्हा परिषद सदस्य वंदना कोद्रे , गणेश घुले, डॉ. दादा कोद्रे, किशोर धायरकर, विशेष कार्यकारी अधिकारी मधुकर कदम, व पुणे जिल्हा भारतीय किसान संघ उपाध्यक्ष्य माऊलीदादा घुले आदि पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन तुषारतात्या घुले व अमितआबा घुले युवा मंचाच्या वतीने करण्यात आले होते.
फोटो ओळी-
मांजरी बुद्रुक : पर्यावरण पूरक गणेश मूर्ती स्टॉलचे उद्घाटन करताना नगरसेविका उज्वला जंगले, माजी उपसरपंच अमित घुले.