काबुल : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर देशातील परिस्थिती बिकट झाली आहे. लोक देश सोडण्यासाठी विमानतळाकडे धाव घेत आहेत. विमानतळावर गर्दी उमटली आहे. याचदरम्यान काबूल एयरपोर्टवरील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे.
Afghans desperate to flee the Taliban cling onto a U.S. military jet as it takes off from Kabul’s airport.
At least five people plunged to their deaths in the chaos, reports say https://t.co/GsynDtb5yM @Quicktake pic.twitter.com/H3ZznMcK7Q
— Bloomberg (@business) August 17, 2021
काबूल विमानतळावरुन USAF’s च्या C-17A या वाहतूक विमानाने उड्डाण केले . अफगाणिस्तानातून पळून जाण्यासाठी तरुण थेट विमानाच्या इंजिनवरच बसूनच लँडिंग गिअर पकडून होते.
काबूलमधून बाहेर पडण्यासाठी त्यांची ही धडपड होती. परंतु विमानाने उड्डाण करताच लँडिंग गिअर पकडलेले अनेक अफगाणी लोक हवेतून खाली पडले असल्याचे या व्हिडियोत दिसत आहे.
विमानाने उड्डाण केल्यानंतर या विमानाच्या इंजिनावर चढलेल्या लोकांचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. नागरिकांची देश सोडून जाण्यासाठी विमानतळावर एकच झुंबड उडाली आहे.