नेवासा – मतदार संघातील रखडत आलेल्या प्रश्नांना वाचा फोडून प्रसंगी राज्य आणि केंद्र सरकारकडे सतत समस्यांचा पाठपुरावा करुन अनेक समस्या सोडविण्यात पटाईत असलेले शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांचा चांगलाच हातखंडा झाला आहे.
नेवासा तालुक्यातील धरणग्रस्तांच्या समस्या गेल्या 40 ते 50 वर्षांपासून शासनदरबारी ‘जैसे थे’च असून, या धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी आता खा. लोखंडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्या संर्दभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तसेच पत्र दिले असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने संबंधितांची बैठक बोलविली आहे.
या धरणग्रस्तांच्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी माळीचिंचोरे (ता.नेवासा) येथील धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष दिगंबर आवारे यांनी याबाबत खासदार लोखंडे यांच्याकडे धरणग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी दाद मागितली. खासदार लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी पत्र दिले आणि झटक्यात मुख्यमंत्र्यांनी संबंधित खात्याला बैठक लावण्याचे आदेश पारित केले आहे.
यामुळे जायकवाडी व मुळा धरणग्रस्तांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित खासदार लोखंडे यांच्या समवेत मुंबई मंत्रालयात लवकरच बैठक होणार आहे. धरणग्रस्तांच्या 40 ते 50 वर्षांच्या समस्येला अखेर वाचू फोडून लवकरच न्याय मिळणार असल्याचा आशावाद आवारे यांनी बोलतांना केला.
मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत खासदार लोखंडे व धरणग्रस्त कृती समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक मुंबई मंत्रालयात होवून धरणग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढून धरणग्रस्तांना न्याय देण्यासाठी खासदार लोखंडे यांनी एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्र्यांसमवेत खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धरणग्रस्तांच्या समस्या सोडविल्या जाणार असल्यामुळे धरणग्रस्त कृती समितीकडून खा. लोखंडे यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. लवकरच धरणग्रस्तांच्या समस्यांवर तोडगा काढला जाणार असल्यामुळे खा. लोखंडेंवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.