सॅन सॅल्वाडोर :- अल साल्वाडोरच्या किनाऱ्याजवळ प्रशांत महासागरामध्ये आज भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला. या भूकंपाचा धक्का मध्य अमेरिकेच्या बहुतेक भागामध्ये जाणवला आहे.
निकारागुआपासून ग्युटेमालापर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे काही शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. अनेक जणांनी सुरक्षिततेसाठी रस्त्यांवर धाव घेतली होती.
या भूकंपाचा केंद्रबिंदू अल साल्वाडोरमधील इतिपुकाच्या दक्षिणेला 43 किलोमीटर अंतरावर आणि जमिनीखाली 70 किलोमीटर अंतरावर होता, असे “यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे’ने म्हटले आहे.
अल साल्वाडोरच्या राजधानीमध्ये सर्वाधिक भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, यामुळे कोठेही जीवित अथवा वित्तहानीचे वृत्त नाही. या भूकंपामुळे त्सुनामी लाटा उसळण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे अल साल्वाडोरच्या पर्यावरण मंत्र्यांनी म्हटले आहे.