अकलूज – दत्तनगर खंडाळी (ता. माळशिरस) येथे छत्रपती संभाजीराजे ग्रुपच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी प्रगतशील बागायतदार दीपक पताळे-पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस विनोद थिटे, राष्ट्रवादीचे युवा नेते विक्रम मेथा, शहाजी इंगवले देशमुख, बाळासाहेब पवार , आकाश पवार, स्वप्निल पवार , स्वप्निल गायकवाड, माऊली तीपे, देवा कांबळे, विजय मगर, बली पवार, हिंदवी पवार आदी उपस्थित होते.
प्रशांत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ पवार यांनी आभार मानले.