यवत : बोरीऐंदी (ता. दौंड) येथे गणपती विसर्जन दरम्यान संकेत सहदेव म्हेत्रे 22 वर्षीय युवक विहिरीत बुडून तीन तासाहून अधिक वेळ झाला आहे. घटनास्थळी यवतचे पोलिस निरीक्षक नारायण पवार पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले यांनी भेट दिली असून मदत कार्य सुरू आहे. आज गणपती विसर्जन करताना तालुक्यातील इतर मंडळांनीही काळजीपूर्वक गणपती विसर्जन करावे असे आव्हान पोलिसांकडून करण्यात आले आहे.