कापूरहोळ – तरूणांनी संघटीत होऊन आपले गाव, तालुका, जिल्ह्याचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहावा असे काम करण्याची गरज आहे. छत्रपती शंभूराजांच्या दुधाई धाराऊ गाडे पाटील या माऊलींचा इतिहास सर्वांसाठी आजही प्रेरणादायी आहे, असे ह.भ.प.धर्मराज हांडे महाराज यांनी सांगितले.
वीर धाराऊमाता जंयती उत्सव शुक्रवारी (दि. 10) तारखेला धाराऊतीर्थ कापुरव्होळ (ता. भोर) येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी वीर धाराऊ माता जयंती उत्सव सोहळा व्याख्याते राकेश पिंजनसरकार शुभाशिर्वाद धर्मराज महाराज हांडे, डॉ. प्रवीण दबडगाव, इतिहास संशोधक सुरेश शिंदे, सरपंच योगेश गाडे पाटील, माजी सरपंच किरण गाडे पाटील, उपसरपंच अलका जगताप, गुलाब गाडे पाटील, ट्रस्ट अध्यक्ष अमित गाडे पाटील, उपाध्यक्ष जनार्दन गाडे पाटील,मस्कोबा गाडे पाटील, पंकज गाडे पाटील, माऊली गाडे पाटील, उत्तम गाडे पाटील, तुकाराम गाडे पाटील, रवींद्र गाडे पाटील, गजानन गाडे पाटील, योगेश गाडे पाटील, सचिन गाडे पाटील, तुळशीराम अहिरे, सचिन वीर यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन पांडुरंग गाडे पाटील यांनी केले. रघुनाथ गाडे पाटील यांनी आभार मानले.