सांगवी,(वार्ताहर) – पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील बार्शीकर नागरिकांनी एकत्र आले पाहिजे, या हेतूने स्थापन करण्यात आलेल्या बार्शी मित्र मंडळाचा स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या वेळी डॉ. जयवंत महाराज बोधले यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयुष्मान भारत योजनेचे राज्यप्रमुख ओमप्रकाश शेटे होते. या वेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री दिलीपराव सोपल, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर माई ढोरे, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप, ज्येष्ठ पत्रकार राजा माने,
वैरागचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर, युवा उद्योजक अमोल पाटील, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी शरद घावटे तसेच पुणे व पिंपरी-चिंचवडमधील बार्शीकर अधिकारी, उद्योजक व व्यावसायिक उपस्थित होते.
यावेळी हभप डॉ. जयवंत बोधले महाराज यांना ‘जीवनगौरव’, आंतरराष्ट्रीय टेनिसपट्टू प्रार्थना ठोंबरे यांना ‘बार्शीभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अतुल पाटील यांनी, तर आभार कार्याध्यक्ष डॉ. दीपक बोधले यांनी मानले.