डॉ. आंबेडकर योजनेंतर्गत विकासकामे सुरू – गृहमंत्री दिलीप वळसे

आंबेगाव-शिरूरच्या निर्वाचन क्षेत्रासाठी 3 कोटी 44 लाख रुपयांचा निधी

मंचर  -आंबेगाव-शिरूर मतदार-संघामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना (दलितवस्ती विकास योजना) या कार्यक्रमांतर्गत 3 कोटी 44 लाख रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

शिरुर तालुक्‍यातील जांबुत येथे मागासवर्गीय बहुद्देशीय सभामंडप बांधणे 10 लाख, पिंपरी दुमाला येथे मागासवर्गीय अंतर्गत रस्ता कॉक्रिटीकरण करणे 10 लाख, धामारी-कुराणवस्ती येथे बहुद्देशीय सभामंडप बांधणे 5 लाख, करंदी-सिद्धार्थनगर येथे बहुद्देशीय सभामंडप बांधणे 10 लाख, सोनेसांगवी येथे अनुसुचित जाती जमाती वस्तीत सामाजिक सभामंडप बांधणे 10 लाख,

गणेगाव खालसा येथील मातंगवस्ती येथे हायमॅक्‍स दिवे बसविणे 3 लाख, कारेगाव येथील मागासवर्गीय अंतर्गत रस्ता करणे 8 लाख, रांजणगाव गणपती येथे मातंगवस्तीवर सभामंडप बांधणे 10 लाख, रांजणगाव गणपती येथे मातंग वस्तीत सभागृह बांधणे 15 लाख, सोनेसांगवी येथील मागासवर्गीय अंतर्गत रस्ता करणे 8 लाख,

करंदी-सिद्धार्थनगर रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 8 लाख, धामारी येथील मागासवर्गीय अंतर्गत रस्ता करणे 7 लाख, हिवरे येथील मागासवर्गीय अंतर्गत रस्ता करणे 5 लाख, केंदुर येथील कारेगाव-केंदुर मुख्य रस्ता ते मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा रस्ता करणे 8 लाखे, पाबळ-इंदिरानगर मागासवर्गीय वस्ती येथे सभामंडप बांधणे 5 लाख,

जातेगाव बुद्रुक येथील गावठाण ते मागासवर्गीय वस्तीला जोडणारा रस्ता करणे 5 लाख, टाकळीहाजी-चर्मकारवस्ती येथे समाजमंदिर बांधणे 8 लाख, रांजणगाव गणपती येथे मातंगवस्ती ते मोडकाई रस्ता डांबरीकरण करणे 40 लाख, मुखई-इंदिरानगर येथे रस्ता कॉंक्रिटकरण करणे 9 लाख असे एकुण 1 कोटी 84 लाख रुपयांच्या कामांना निधी मंजूर झाला आहे.

आंबेगाव तालुक्‍यातील पोखरी येथे मागासवर्गीय वस्ती रस्ता करणे 10 लाख, ढाकाळे येथे मागासवर्गीय रस्ता करणे 10 लाख, पारगाव तर्फे खेड येथील मागासवर्गीय वस्ती येथे बहुद्देशीय सभामंडप बांधणे 10 लाख, पेठ येथे मागासवर्गीय अंतर्गत रस्ता करणे 10 लाख, रांजणी येथे मागासवर्गीय वस्ती येथे हायमॅक्‍स दिवे बसविणे 3 लाख,

तळेघर येथील इंदिरानगर येथे हायमॅक्‍स दिवे बसविणे 3 लाख, निगडाळे येथे दलितवस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, दिगद येथे मागासवर्गीय वस्तीअंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख, आमोंडी येथे मागासवर्गीय वस्तीकडे जाण्यासाठी मोरीपुल बांधणे 5 लाख, पेठ येथे जुना पुणे-नाशिक रस्ता मागासवर्गीयवस्ती मार्गे नवीन पुणे-नाशिक हायवे जोडरस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख,

घोडेगाव मातंगवस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, घोडेगाव वृंदावन कॉम्पलेक्‍स येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, थुगांव मागासवर्गीय वस्ती येथे पाण्याची टाकी बांधणे 5 लाख, कुरवंडी चर्मकारवस्तीअंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख, कुरवंडी वाघदरेवस्ती येथे समाजमंदिर बांधकाम करणे 5 लाख, चांडोली बुद्रुक येथे गावठाण ते मागासवर्गीय वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख,

वळती येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख, भागडी येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 7 लाख, भराडी येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख, एकलहरे येथे मागासवर्गीय वस्ती ते शिंदेवाडी उर्वरीत रस्ता डांबरीकरण करणे 7 लाख,

रांजणी येथे मागासवर्गीय वस्ती येथे 3 शौचालय युनिट बांधणे 5 लाख, खडकी-वडार वस्ती येथे शौचालय युनिट बांधणे 5 लाख,साकोरे-मोरेवस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 5 लाख रुपये, असे एकुण 1 कोटी 60 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.