मुंबई/नवी दिल्ली – सध्या वृत्त माध्यमात आणि समाज माध्यमातील बातम्यानुसार जुन्या नोटा किंवा कॉईन बदलून देण्याच्या योजना अनधिकृतपणे काही व्यक्ती किंवा संस्था चालवीत असल्याचे दिसून येत आहे.
अशा प्रकारच्या योजनांना रिझर्व्ह बॅंकेचा कसलाही पाठिंबा नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या व्यवहारापासून सावध राहावे असा आग्रह रिझर्व्ह बॅंकेने पुन्हा एकदा नागरिकांना केला आहे.
कमिशनच्या आधारावर जुन्या नोटा आणि नाणी बदलून देण्याच्या काही योजना काहीजण चालवीत असल्याचे रिझर्व्ह बॅंकेच्या निदर्शनास आले आहे. यासंदर्भात बऱ्याच नागरिकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे तक्रारी केल्या आहेत.
मात्र अशा प्रकारच्या कसल्याही योजनेला रिझर्व्ह बॅंकेचा पाठिंबा नाही किंवा रिझर्व्ह बॅंकेने या कामासाठी कोणालाही नियुक्त केलेले नाही असे स्पष्टीकरण रिझर्व्ह बॅंकेने केले आहे.
अशा प्रकारच्या व्यवहारासाठी काही व्यक्ती आणि संस्था रिझर्व्ह बॅंकेच्या लोगोचा दुरुपयोग करत आहेत. त्यांच्याशी रिझर्व्ह बॅंकेचा कसलाही संबंध नाही असेही स्पष्टीकरण रिझर्व्ह बॅंकेने केले आहे.
अशा प्रकारचे व्यवहार रिझर्व्ह बॅंक करीत नाही किंवा कमिशनच्या आधारावर कोणालाही नियुक्त करीत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या व्यवहारात नागरिकांनी पडू नये असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे.