मुंबई – मुंबई मपालिकेद्वारे मुलुंडमधील जम्बो कोविड रुग्णालयात परिचारिका व डॉक्टर भगिनींनी उपचारार्थ दाखल असलेल्या भावांना; तर कोविडची बाधा झालेल्या भगिनींनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर भावांना राखी बांधून हा सण साजरा केला.
राखी बांधल्यानंतर ओवाळणी म्हणून भावांनी आपल्या बहिणींना मास्क’ची भेट दिली. तसेच घरातील सर्वांना योग्य प्रकारे मास्कचा वापर करण्याचे व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे “प्रॉमिस’ घेतले. या अनोख्या रक्षांबधनबद्दल रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर प्रदीप आंग्रे यांनी माहिती दिली.
रुग्ण बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे
या रुग्णालयात सध्या 308 खाटा कार्यारत असून यापैकी 58 खाटा या अतिदक्षता खाटा’ आहेत. याच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्ण बांधवांना आज राखी बांधून येथील डॉक्टर आणि परिचारिकांनी राखी पौर्णिमा साजरी केली. तर रुग्णालयात दाखल असलेल्या महिला रुग्णांनीदेखील रुग्णालयातील आपल्या डॉक्टर भावांना राखी बांधून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने आजचा राखी पौर्णिमेचा पवित्र सण साजरा केला.